हिमस्खलनामध्ये ७ जवान बेपत्ता

0
12

अरुणाचलमध्ये हिमस्खलनाची मोठी घटना घडली असून, त्यात ७ जवान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदतकार्य सुरू आहे. हिमस्खलनाची ही घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगांमध्ये घडली. रविवारी जवानांचे एक पथक या भागात गस्तीसाठी निघाले होते, तेव्हाच हिमस्खलन झाल्याने हे जवान त्यात अडकले. त्यांना वाचविण्यासाठी विशेषज्ञांच्या टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.