हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद

0
14

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या तडाख्यात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलनात ७ जवान अडकल्याचे वृत्त ६ फेब्रुवारीला समोर आले होते. त्यानंतर जवानांच्या बचावकार्यासाठी लष्कराने मोहीम राबवली; पण जवानांना वाचवण्यात यश आले नाही.

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमधील उंच शिखरांवर गेल्या अनेक दिवसांपासून खराब हवामान आणि जोरदार हिमवृष्टी होत आहे. अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उंच भागात ६ तारखेला हिमस्खलनाची घटना घडली होती. कामेंग सेक्टरमध्ये ७ जवानांचे एक पथक गस्तीवर होते. यावेळी अचानक हिमस्खलन झाले आणि गस्ती पथकातील सर्व ७ जवानत त्या हिमस्खलनाच्या कचाट्यात आले. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सर्व जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.