हिंसाचाराच्या मुद्द्यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली जाहीर माफी

0
3

गेल्या दीड वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यादरम्यान काल वर्षाच्या शेवटच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर खेद व्यक्त करत माफी मागितली.
3 मे 2023 पासून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असून, त्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. कालच्या पत्रकार परिषदेत हिंसाचाराच्या मुद्द्यावर बिरेन सिंह यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होते. गेल्या 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी जनतेची माफी मागू इच्छितो, असे ते म्हणाले.