प्रादेशिक भेदभाव व धर्ननिरपेक्षता याविषयीच्या मुद्द्यांद्वारे जम्मू काश्मीरमधील विरोधी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने हिंदू मतदारांना भुलविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी वरील मुद्दे आपल्या भाषणात उपस्थित केले.