हिंटन, होपफिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

0
7

कृत्रिम न्यूरल नेटवर्कवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित तंत्रज्ञानासाठी सन्मान

2024 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार काल जाहीर झाला. यंदा हा पुरस्कार एआयचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना मिळाला. कृत्रिम न्यूरल नेटवर्कवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

सोमवारपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली असून, पहिल्यांदा वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल जाहीर झाले होते. त्यानंतर आता भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल जाहीर झाले आहे. यानंतर रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य व जागतिक शांतता या क्षेत्रांतील अतुलनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार जाहीर होणार आहे.
नोबेल पारितोषिक विजेत्यांना 11 मिलिअन स्वीडिश क्रोनर म्हणजेच 8.90 कोटी रुपये रोख रक्कम दिली जाईल. भौतिकशास्त्रासाठीचा हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे दिला जातो.

जेफ्री ई. हिंटन आणि जॉन जे. होपफिल्ड या दोघांनी भौतिकशास्त्राच्या साधनांचा वापरून आजच्या शक्तिशाली मशीन लर्निंगचा पाया असलेल्या पद्धती विकसित केल्या आहेत, असे पुरस्कार देणाऱ्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने एका निवेदनात म्हटले आहे. कृत्रिम न्यूरल नेटवर्कवर आधारित मशीन लर्निंग सध्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि दैनंदिन जीवनात क्रांती घडवत आहे.