२६/११च्या मुंबई दहशतवादी खटल्यातील सूत्रधार दहशतवादी हाफीज सईद यांच्याविरुद्ध खटला नसून तो देशात फिरण्यास मुक्त आहे, असे पाकिस्तानने काल स्पष्ट केले. तो पाकिस्तानचा स्वतंत्र आणि निर्दोष नागरिक आहे, त्याला देशात कुठेही फिरण्याची मुभा आहे, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले. सईद पाकिस्तानच्या भागात नियंत्रण रेषेकडे जास्त का वावरतोय असे विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. दरम्यान, मुंबईवरील २००८च्या हल्ल्याचा सइद हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा भारताने कायम ठेवला आहे.