उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. हाथरस, अलिगढ, एटा आणि आग्रा या चार जिल्ह्यांमध्ये मृतदेहांचे रात्रभर शवविच्छेदन झाले. मंगळवारी दुपारी एक वाजता फुलराई गावात हा अपघात झाला. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी काल बुधवारी सकाळी 11.30 वाजता हाथरसला भेट दिली. जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली. घटनास्थळी गेले. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. दरम्यान, या अपघातानंतर बाबा भूमिगत झाले. रात्रभर पोलिसांनी छापा टाकला. पोलिस मैनपुरीतील बाबाच्या आश्रमात पोहोचले. पण बाबा तिथे सापडले नाहीत.