‘हाथरस’च्या सीबीआय चौकशीस पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध

0
117

हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाचा सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्यातपासास पीडित कुटुंबाने विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणाखाली या संबंधी चौकशी करावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.
अद्यापही आमचे काही प्रश्न अनुत्तरित असल्याचे यावेळी पीडितेच्या भावाने सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवत असल्याचे जाहीर केले. मात्र, या प्रकरणी आधीच एसआयटीकडून तपास सुरू असताना आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही, असे पीडितेच्या भावाने सांगितले. यावेळी त्याने हाथरसच्या जिल्हादंडाधिकार्‍यांवर कारवाई का करण्यात आली नाही? आमच्या कुटुंबासोबत कोणी गैरव्यवहार केला आणि आमच्या कुटुंबाला कोणी धमकावले या प्रश्‍नांची उत्तरे आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निरिक्षणाखाली आम्हाला चौकशी हवी असल्याची त्यांनी मागणी केली आहे.