हवामान बदलाविरोधात कृती करण्याची वेळ ः मोदी

0
97

जागतिक हवामान बदलाविरोधात कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत बोलताना केले. चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे, आता वेळ आली आहे कृतीची असे मोदी म्हणाले. हवामान बदलाच्या विरोधात भारताकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती मोदी यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले, ‘आम्ही लाखो कुटुंबांना स्वयंपाक गॅसच्या जोडण्या दिल्या आहेत. जल विकास व पावसाच्या पाण्याच्या साठ्यासाठी आम्ही जलजीवन मिशन सुरू केले आहे. प्लास्टिक वापराविरोधातील जागृतीचा उल्लेखही त्यांनी केला.