बरेलीहून अलाहबादला निघालेले भारतीय हवाई दलाचे एएलएच ध्रुव हे हेलिकॉप्टर कोसळून सात जण मृत्युमुखी पडले. पायलटने नियंत्रण कक्षाला बिघाडाची सूचना दिली होती मात्र तात्काळ सर्व संपर्क तुटला, असे प्रवक्त्याने सांगितले. यात दोन पायलट व पाच जवान होते. काल दुपारी ३.५३ वा. हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते त्यानंतर ४.५७च्या दरम्यान, ते कोसळले.