आमदार मायकल लोबो यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे चित्रण घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात बंद असून पोलिसांनी तो कॅमेरा हस्तगत करून ती फुटेज मिळवल्यास तपासकामाला गती येऊ शकते. पण पोलिसांनी अद्याप ही फुटेज मिळविण्यासाठी कोणतीही हालचाल केली नसल्याचे एका राजकीय नेत्याने सांगितले.कुणाच्या तरी दडपणाखाली हल्लेखोराला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रयत्न करीत असल्याचे या नेत्याने नाव गुपीत ठेवण्याच्या अटीवर माहिती देताना स्पष्ट केले.
पोलिसांनी हा कॅमेरा तात्काळ हस्तगत करायला हवा होता. कॅमेर्यातील फुटेज यापूर्वीच नष्ट करून टाकण्यात आली असावी, अशी भीतीही या नेत्याने व्यक्त केली. पैशांच्या देवाणाघेवाणीवरूनच हा हल्ला झाल्याचा दावा या नेत्याने केला.
अशा प्रकारे या गुन्हेगारांना अभय मिळाल्यास भविष्यात त्यांच्याकडून आणखी मोठे हल्ले होण्याची भीती असल्याचेही या नेत्याचे म्हणणे होतेे.