हरित दिवाळी संदेशासाठी काश्मीरात सायकल रॅली

0
112

जम्मू श्रीनगर महामार्गावरून काल स्वच्छ व हरित दिवाळीचा संदेश देण्यासाठी उधमपूरचे जिल्हा विकास आयुक्त पियुष सिंगला यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली ६५ कि. मी. अंतराच्या या रॅलीत २०हून अधिकजणांचा सहभाग होता. त्यात काही महिलांचाही सहभाग होता.

या रॅलीदरम्यान बेटी बचाव, बेटी पढाव मोहिमेची जागृतीही करण्यात आली. रॅली दरम्यान कट्रा डोमेल येथे सहभागींची केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी भेट घेतली. तसेच लोकांनीही मार्गावर सायकलपटूंना अभिवादन केले.