अखेर हरयाणातील जननायक जनता पार्टीबरोबर (जेजेपी) भाजपने काल युती झाल्याची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली. तसेच हरयाणाचा मुख्यमंत्री भाजपचा असेल व उपमुख्यमंत्रीपद जेजेपीला देण्यात येईल असेही शहा यांनी जाहीर केले. मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता आहे. तर जेजेपीचे प्रमुख दुष्यंत चौताला यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे.
दरम्यान, दुष्यंत चौताला यांनी राज्यात स्थिरता देण्यासाठी ही युती आवश्यक असल्याचे म्हटले आहे.