हरमलमधील दोन बांधकामे पाडण्यासाठी 29पर्यंत मुदत

0
5

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हरमल पंचायतीचे माजी सरपंच बेनार्ड फर्नांडिस यांना दोन बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी येत्या 29 जानेवारी 2024 पर्यंत मुदत दिली आहे.
गिरकरवाडा हरमल येथील नो डेव्हलपमेण्ट झोनमधील (एनडीझेड) दोन्ही बांधकामे आपले वडील आणि काकांनी केल्याचा दावा माजी सरपंच फर्नांडिस यांनी न्यायालयात केला. एनडीझेडमधील बेकायदा बांधकामामुळे बेनार्ड फर्नांडिस यांना सरपंचपदावरून हटविण्यात आले आहेत. माजी सरपंच फर्नांडिस यांची दोन्ही बांधकामे सीलबंद करण्यात आली आहेत, अशी माहिती हरमल पंचायतीच्या सचिवांनी न्यायालयाला दिली.

गिरकरवाडा हरमल येथे एनडीझेड क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे उभारण्यात आलेली आहेत. एकूण 64 पैकी 49 बेकायदा बांधकामे सीलबंद करण्यात आली आहेत. तसेच, शिल्लक बेकायदा बांधकामांना येत्या 15 दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा किनारी विभागात व्यवस्थापन प्राधिकरणाला न्यायालयाला दिली.