हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार

0
6

इस्रायल आणि पॅलेस्टाईनी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष झाले आहे. इस्रायलने गाझा पट्टीतले हल्ले वाढवले आहेत. गुरुवारी इस्रायली लष्कराने हमासचे तळ हेरुन त्यावर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार हा ठार झाला, असा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.