हमासकडून इस्त्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

0
3

इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलच्या मध्यभागी पुन्हा एकदा सायरनचे आवाज घुमत आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासकडून इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यानंतर आता अनेक महिन्यांनी हमासने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हमासने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हमासचे सशस्त्र दल असलेल्या अल-कासम ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून ‘तेल अवीव’वर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डाकली असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलने शहरात सायरन वाजवून नागरिकांना दक्ष राहण्यास सांगितले आहे. हमासकडून पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे इस्रायलने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

अल-कासम ब्रिगेडने झिओनिस्टने मानवतेचा नरसंहार केला. त्यांना आम्ही या हल्ल्यातून चोख उत्तर देत असून हमासच्या अल-अक्सा टीव्हीनेही हा हल्ला गाझापट्टीतून केल्याचे सांगितले आहे.