हनी ट्रॅपप्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन

0
44

>> उपमहानिरीक्षक अस्लम खान प्रमुख

पुरूषांना आपल्या मोहपाशात अडकवून नंतर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलांची चौकशी करण्यासाठी एक बारा सदस्यांचे विशेष चौकशी पथक पोलीस उपमहानिरीक्षक अस्लम खान यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आले आहे.

पुरूषांना आपल्या मोहपाशात अडकवून बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोघा महिलांना हल्लीच गोव्यात अटक करण्यात आली होती. ही प्रकरणे गेल्या ऑगस्ट महिन्यात उघड झाली होती. ह्या महिलांविरूद्ध कळंगुट व कांदोळी पोलीस स्थानकात गुन्हे नोंदवण्यात आले होते. गोवा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असता दोन महिलांनी बलात्कारप्रकरणी गोव्यात तिघा जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याशिवाय असाच दोन तक्रारी गुजरातमध्ये नोंदवल्याचे आढळून आले होते. 12 सदस्यांचे विशेष पथक आता याप्रकरणी तपासकाम करणार आहे.