हणजूणमधील 175 बेकायदेशीर बांधकामे सील करण्यास प्रारंभ

0
16

हणजूण येथील नो डेव्हलपमेंट झोनमधील 175 बेकायदेशीर बांधकामांना सील करण्याची प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांनी काल सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हणजूण येथील नो डेव्हलपमेंट झोनमधील 175 बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हणजूण पंचायत सचिव, गटविकास अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही बांधकामे काल सील करण्यात आली. उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना 10 दिवसांत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बेकायदा बांधकामासाठी नगरनियोजन विभागाकडून मान्यता घेण्यात आलेली नाही.