गुन्हा अन्वेषण पोलिसानी काल हडफडे येथे एका सदनिकेवर छापा मारून वेश्या व्यवसाय चालवणार्या तिघा जणांना अटक केली व तीन युवतींची सुटका केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद साहिदूल इस्लाम (३३), प. बंगाल, दिलीप पॉल (२५), केरळ, एन्. सयत (२२), केरळ यांचा समावेश आहे. त्यांचे तीन साथीदार फरार असून आलेक्स, नील व मान्युएल अशी त्यांची नावे आहेत.