स्व. मारियो मिरांडा कला दालन वर्षभरात उभारणार ः मुख्यमंत्री सावंत

0
2

वस्तुसंग्रहालही उभारणार असल्याची माहिती

पद्मविभूषण स्व. मारियो मिरांडा यांना समर्पीत वस्तुसंग्रहालय आणि आर्ट गॅलरी वर्षभरात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिले.
पद्मविभूषण स्व. मिरांडा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वस्तूसंग्रहालय उभारण्याची मागणी आलेमाव यांनी काल केली.

राज्य सरकारला पद्मविभूषण स्व. मारियो मिरांडा यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. मिरांडा यांच्या कलाकृती मांडणारे संग्रहालय सुरू करण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या संग्रहालय विभागाने जुन्या सचिवालय इमारतीमध्ये (आदिल शाह पॅलेस) एक अत्याधुनिक संग्रहालय स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या संग्रहालयातील काही जागा केवळ स्व. मारियो मिरांडा यांच्या कलाकृतीसाठी उपलब्ध करण्यात येतील. जुने गोवे येथील नियोजित राज्य संग्रहालयात विशेष दालन उपलब्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पद्मविभूषण मारियो मिरांडा संग्रहालय हे युवा कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र असावे, असे मत आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी व्यक्त केले.
राज्यात पुतळ्याविषयी धोरण तयार करण्याची गरज आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.