स्वातंत्र्यसैनिकांच्या 40 मुलांना सहा महिन्यांत सरकारी नोकरी

0
8

>> मुख्यमंत्री; 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या सुमारे 40 मुलांना येत्या सहा महिन्यांत सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे वितरित केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या 20 मुलांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांचा योग्य मान-सन्मान राखला जात आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी खास योजना राबविली जात आहे. या योजनेखाली आत्तापर्यंत 357 जणांना सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे दिली आहेत. या योजनेखाली प्रलंबित 40 अर्ज लवकरच निकालात काढण्यात येणार असून, सहा महिन्यांत त्या अर्जदारांना सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे दिली जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.