स्वातंत्र्यदिनी पेट्रोल दरात कपातीची घोषणा

0
218

१५ ऑगस्टपासून पेट्रोल दरात १.८९ ते २.३८ रुपये प्रति लिटर एवढी दरकपात करण्यात येणार असल्याचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल सांगितले. जून २०१० मध्ये सरकारने पेट्रोल दरांवरील नियंत्रण काढून टाकल्यानंतर मंत्र्याकडून पेट्रोल दरकपातीची घोषणा केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाहीतर तेल महामंडळाकडून दरांचा आढावा घेतल्यानंतर नवे दर घोषित करण्यात येत होते. दरांचा फेरआढावा प्रत्येक महिन्याच्या १ व १६ तारखेला घेतला जातो. दरम्यान, प्रधान यांनी आपल्या ट्वीटर खात्यावरून ही माहिती दिली.