स्वयंगोलाने केला मोरोक्कोचा घात

0
247

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मोरोक्कोच्या अझिज बौहादोजने इंज्युरी वेळेत नोंदविलेल्या स्वयंगोलामुळे इराणने आपल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात विजयश्रीने केली. अझिजचा स्वयंगोल मोरोक्कोचा घात करून गेला. इराणचा हा १९९८नंतर विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. त्यामुळे त्यांच्यासाठी हे ३ गुण महत्त्वाचे ठरणार आहेत.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. या सामन्यात मोरोक्कोन संघाने खेळावर वर्चस्व राखले होते. परंतु स्वयंगोलामुळे त्यांना पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे मोरोक्कोने पात्रता स्पर्धेत ८ सामन्यांतून केवळ १ गोल घेतला होता. तर इराणने इराणने अपराजित राहिला आहे.

हा सामना गोलशून्य बरोबरीत संपेल असे वाटले होेते. परंतु ९०+५व्या मिनिटाला मोरोक्कोच्या सोफीयान आम्राबटने इराणच्या समान घोड्डोसला गरज नसताना अवैधरित्या खाली पाडल्याने रेफ्रीने इराणला फ्री-कीक बहाल केली. इराणच्या इहसान हाजी सफीने घेतलेल्या फ्री-कीकवीरल चेंेडू सूर मार बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात मोरोक्कोच्या अझिज बौहादोजने हेडरद्वारे चेंडूला स्वतःच्याच जाळीत टाकल्याने इराणला महत्त्वपूर्ण विजय साकारता आला. मोरोक्कोच्या गोलरक्षकाला काहीच करता आले नाही.
आता इराणचा पुढील सामना २० जून रोजी स्पेनविरुद्ध तर मोरोक्कोची लढत बलाढ्य पोर्तुगाली संघाविरुद्ध होणार आहे.