स्वयंअपघातात 21 वर्षीय युवक ठार

0
24

शिगाव-कुळे येथे विजेच्या खांबाला दुचाकीची धडक

शिगाव-कुळे येथील एका फार्मजवळ रस्त्यालगतच्या विजेच्या खांबाला दुचाकीची धडक बसून अनिष कुजुर (21 वर्षे, रा. कुळे) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात घडला. एक उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून अनिष या परिसरात ओळखला जात होता.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिष कुजुर हा युवक शिगावहून कुळेच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. तो शिगाव येथील एका फार्मजवळ पोहोचला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांब्याला दुचाकीची जोरदार धडक बसली. वीज खांबावर त्याचे डोके जोरात आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी मडगाव येथील सरकारी इस्पितळात पाठविला आहे. कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शन खाली उपनिरीक्षक सदानंद देसाई यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.