केंद्र सरकारने आपल्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेखाली गोव्यासाठी पाच वेवगवेगळे प्रकल्प मंजूर केले असून, त्यात 97.46 कोटी रुपयांच्या फोंडा येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, पर्वरीतील 90.74 कोटींच्या टाऊन स्क्वेअरसह अन्य तीन प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात यासंबंधीची माहिती दिली आहे.
उर्वरित तीन प्रकल्पांमध्ये पर्वरीतील खाडी प्रकल्पाचा समावेश असून, त्याचा 23.56 कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. तसेच कोलवा समुद्र किनारा प्रकल्पाचाही समावेश असून, त्यावर 15.65 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय मये गावचा ईको टुरिझम व अमृत धरोहर स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.