स्वत:चे सामर्थ्य ओळखा; एक ‘खादी’ उत्पादन वापरा

0
108

पंतप्रधान मोदींचे पहिले रेडिओ भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रेडिओद्वारे देशाला संबोधित केले. ‘मन की बात’ या कार्यक्रमांतर्गत सुमारे १५ मिनिटे त्यांनी देशाला उद्देशून भाषण केले. स्वत:तील सामर्थ्य ओळखा असे आवाहन करतानाच, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कौशल्य विकसित करा, असे आवाहन त्यांनी केले. महात्मा गांधींना आदरांजली म्हणून सर्वांनी खादी वापरण्याची विनंती त्यांनी केली.
लोकांनी आपल्या सूचना सोशल मिडियाद्वारे आपल्यापर्यंत पोचवाव्यात असे पंतप्रधान म्हणाले. रेडियोद्वारे महिन्यातून निदान दोनदा देशाला संबोधित करणार असल्याचे ते म्हणाले.
अगदी मंगळावर जाण्याची धमक आपल्यात आहे. पण आपण सामर्थ्य विसरून गलितगात्र झालो आहोत. आपल्या सामर्थ्य पुन्हा जागवण्याची गरज आहे. यावेळी मोदींनी विवेकानंदांचा दाखला देत काही गोष्टीही सांगितल्या.
महात्मा गांधींना आदरांजली म्हणून प्रत्येकाने निदान एक खादीचे उत्पादन वापरावे असेही ते म्हणाले. हातरुमाल, बेडशीट, कपडे असे निदान काहीतरी उत्पादन वापरा कारण खादीचे उत्पादन विकले जाणे गरिबांना कमाई मिळवून देत असते, असे ते म्हणाले.