स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ

0
11

केंद्रीय मंत्रालयाने स्मार्ट सिटी योजनेची मुदत येत्या मार्च 2025 पर्यंत वाढविली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2015 मध्ये देशभरातील 100 शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड केली होती, त्यात पणजी शहराचाही समावेश आहे. यापूर्वी पणजी स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे पूर्ण करण्यासाठी जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.