पणजी स्मार्ट सिटीमध्ये जुन्या अबकारी खात्याच्या मुख्यालय परिसरात एक गांजाचे रोपटे आढळून आल्याने काल खळबळ उडाली. येथील पोलीस आणि अमलीपदार्थ विभागाने सदर गांजाचे रोपटे ताब्यात घेतले आहे. स्मार्ट सिटीमध्ये सांतइनेज भागात यापूर्वी गांजाची दोन रोपटी, टोंक येथे एक रोपटे आढळून आले होते. पणजी स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या बाजूला पदपथाचा विकास केला जात असून, रस्त्याच्या बाजूला विविध प्रकारची लहान-लहान रोपटी लावण्यात आली आहेत. पणजी स्मार्ट सिटीमध्ये लावण्यात आलेल्या रोपट्यामध्ये गांजाची रोपटी कशी आढळून येतात, याची चौकशीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.