स्मार्ट सिटीच्या कामांचे सुरक्षा परीक्षण करा

0
4

>> उत्पल पर्रीकर यांची स्मार्ट सिटीच्या सीईओंकडे निवेदनातून मागणी

णजीत स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांचे सुरक्षा परीक्षण करणे, तसेच आतापर्यंत झालेल्या आणि यापुढे होणार असलेल्या कामांचा दर्जा तपासावा, अशी मागणी उत्पल पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पणजी इमॅजिन स्मार्ट सिटीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्ज यांची भेट घेत उत्पल पर्रीकर यांनी सदर दोन प्रमुख मागण्यांसह अन्य तीन मागण्या आपण आपल्या निवेदनातून त्यांच्यासमोर सादर केल्या.

अन्य मागण्यांमध्ये स्मार्ट सिटीची सुरू केलेली ठराविक वेळेत काम पूर्ण करणे, ज्या ठिकाणी ह्या कामामुळे वाहतुकीची कोंडी व आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याकडे खास लक्ष देणे, तसेच काम सुरू असताना लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे की नाही, तसेच कामाच्या दर्जाकडे तडजोड केली जात नाही ना याकडे लक्ष देण्यात यावे अशी सूचना केली असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

पणजीच्या आमदारावर टीकेचा हल्ला
यावेळी पर्रीकर यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर जोरदार टीका केली. स्मार्ट सिटीच्या कामात मोठा भ्रष्टाचार चालू असून, त्याला पणजीचे आमदार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सदर नेत्याची अकार्यक्षमता व बेजबाबदारपणा यामुळेच तेथे झालेल्या एका अपघातात 21 वर्षीय युवकाचा बळी गेल्याचे पर्रीकर म्हणाले.