स्नानावेळी महिलेचा काढला व्हिडिओ; अल्पवयीन ताब्यात

0
7

फोंडा पोलीस हद्दीत एका 32 वर्षे महिलेचा स्नान करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या 17 वर्षी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाला अपना घरात पाठविण्याची तयारी केली आहे. 8 जुलै रोजी संध्याकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन एक तरुण बाथरुमच्या खिडकीतून मोबाईलद्वारे रिकॉर्डिंग करीत असल्याचे महिलेने पाहिले होते. या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. प्राप्त माहितीनुसार, बाथरुमच्या खिडकीतून एक तरुण मोबाईलद्वारे रिकॉर्डिंग करीत असल्याचे महिलेने पाहिल्यानंतर आरडाओरडा केला होता. मात्र तो त्यावेळी सापडला नसल्याने घरातील मंडळींनी बाहेर जाऊन शोध घेतला; पण कुणीच सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर 17 वर्षी अल्पवयीन मुलाने हे रिकॉर्डिंग केल्याचे उघड झाले. महिलेने रितसर तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी तपास करून 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर त्याला अपना घरात पाठविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.