स्तनाचा कर्करोग – भाग १

0
148
  • वैद्य सौ. स्वाती अणवेकर

सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा हा स्तनाचा कर्करोग पुष्कळ बायकांमध्ये अकाली व वाढत्या मृत्यूचे कारण बनला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये असे आढळले की भारतामध्ये २८ स्त्रियांपैकी १ स्त्री ही स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. शहरांमध्ये तर हे प्रमाण २२ स्त्रियांमध्ये १ स्त्री असे आहे. तर गावात हेच प्रमाण ६० स्त्रियांमध्ये १ स्त्री असे आहे.

भारतात साधारणपणे ४३-४६ ह्या वयोगटातील स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याचा जास्त धोका संभवतो. तर परदेशात ५३-५७ ह्या वयोगटातील स्त्रियांना हा धोका जास्त असतो. कर्करोगाचे काही धोक्याचे मापदंड संशोधकांनी सांगितले आहेत ते आपण आता जाणून घेऊया :
ह्याची दोन गटात विभागणी केली आहे –
१) न बदलता येणारे धोक्याचे मापदंड :
वय, लिंग, कुटुंबातील रक्ताच्या नातलगांना झालेला स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण, मासिक पाळीचा इतिहास, पहिल्या मासिक पाळीच्या वेळचे वय व रजोनिवृत्तीचे वय.
२) बदलता येणारे धोक्याचे मापदंड :
इचख, पहिल्या प्रसूतीच्या वेळचे वय, अपत्य संख्या, स्तनपानाचा कालावधी, व्यसने, आहार व गर्भपाताची संख्या.
स्क्रीनिंग :
ज्या बायकांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाटते, त्यांची शारीरिक व जनुकीय तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्तन तपासणी उपक्रमामध्ये असे सांगितले आहे की वयोगट ५०-७० ह्या मधील स्त्रियांनी दर २-३ वर्षांनी एकदा स्तनाची पूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ह्यात प्रामुख्याने अधिक धोका असणारे तसेच कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास असणार्‍या स्त्रियांची तपासणी प्रथम होणे
आवश्यक आहे, असे सांगितले आहे. ज्या स्त्रियांची आई बहीण अथवा मुलगी स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे त्या स्त्रियांमध्ये ह्याचा धोका अन्य स्त्रियांपेक्षा २-३ पट अधिक वाढतो.

स्तनाचा कर्करोग
५ % स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त स्त्रियांमध्ये इठ – उ-१ किवा इठ – उ – २ ह्या दोन स्तनाचा कर्करोग उत्पन्न करणार्‍या जनुकांपैकी एका जनुकामध्ये काही हानिकारक बदल घडलेले आढळतात. अशा स्त्रियांच्या नातेवाईकामध्ये देखील हे जनुक आढळले तर त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका ५०-८५% संभवतो. स्तन कर्करोगा विरोधात जग भर सुरू असणार्‍या जनजागृती अभियानामुळे मागील काही दशकांमध्ये पुष्कळ स्त्रिया ाराोसीरहिू करून घेऊ लागल्या आहेत, असे झाल्यामुळे स्तन कर्करोग झाल्यास तो लवकर समजू लागला आहे, आणि त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होत असल्यामुळे स्त्रियांचे स्तनाचा कर्करोग होऊन होणारे मृत्यू प्रमाण घटले आहे, ह्यात शंका नाही. बरेचदा असे होते की अशा तपासण्या करून देखील
२०% कर्करोग हे तपासणीच्या वेळीच आढळून न येता पुढे कधीतरी स्तन कर्करोगाची लक्षणे अशा स्त्रियांमध्ये दिसून येतात. ती देखील साधारपणे दुसर्‍या तपासणीपूर्वी.
स्तनाच्या कर्करोगाचे रोग परिस्थिती विज्ञान आता आपण पाहुया :
स्तनाचा कर्करोग हा हार्मोनशी निगडीत आजार आहे. ज्या स्त्रियांमध्ये ओवरी कार्यरत नसते व ज्यांना कधीच शीींीेसशप ीशश्रिरलशाशपीं ींहशीरिू घ्यावी लागली नाही त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अगदी नगण्य असते.

खालील तीन कालावधी हे स्तन कर्करोग उत्पन्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात:
१) प्रथम मासिक पाळीच्या वेळी स्त्रीचे वय :
ज्या स्त्रियांना वयाच्या सोळाव्या वर्षी पहिली मासिक पाळी येते त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता १२व्या वर्षी पहिली मासिक पाळी आलेल्या स्त्रियांपेक्षा ५०-६० % कमी असते.

२) रजोनिवृत्तीचा कालावधी :
ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही रजोनिवृत्तीच्या काळापेक्षा १० वर्षे आधीच येणे बंद होते मग ती नैसर्गिक असो अथवा शस्त्रक्रिया केल्यामुळे, अशा स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका ३५% कमी असतो.
३) पहिल्या बाळंतपणाच्या वेळी स्त्रीचे वय :

स्तनाचा कर्करोग :
ज्या स्त्रियांना पहिले मूल हे १८ व्या वर्षी होते. त्यांना देखील स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ३०-४०% कमी असते. तसे पाहता आशिया खंडातील स्त्रियांच्या शरीरात एीींीेसशप व झीेसशीींशीेप हार्मोन्सचे प्रमाण हे उत्तर अमेरिका व पश्चिम युरोप मधील स्त्रियांच्या तुलनेत बरेच कमी असते म्हणून आशिया खंडातील स्त्रियांना स्तन कर्करोगाचा धोका त्यामानाने कमी संभवतो.