श्रीलंका व पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने काल आपला संघ जाहीर करताना अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षांत स्टोईनिसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३.५०च्या सरासरीने केवळ ३२९ धावा केल्या असून १५ बळी त्याच्या नावावर आहेत. आंतराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील दोन सामन्यांत ४च्या सरासरीने केवळ ८ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. या दोही लढतीत त्याला गोलंदाजीत एकही बळी मिळविता आलेला नाही. स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर व स्टीव स्मिथ यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीग टी-ट्वेंटीमधील मालिकावीर डार्सी शॉर्ट यालादेखील डच्चू देण्यात आला आहे. मधल्या फळीसाठी ऍश्टन टर्नर व बेन मॅकडेरमॉट यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. ग्लेन मॅक्सवेल व यष्टिरक्षक आलेक्स केरी यांचादेखील संघात समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया संघ ः ऍरोन फिंच (कर्णधार), ऍश्टन एगार, आलेक्स केरी, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडेरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, बिली स्टेनलेक, मिचेल स्टार्क, ऍश्टन टर्नर, अँडी टाय, डेव्हिड वॉर्नर व ऍडम झंपा.
ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका
पहिला सामना ः २७ ऑक्टोबर, सकाळी ८ वाजता, ऍडिलेड, दुसरा सामना ः ३० ऑक्टोबर, दुपारी १.४० वाजता, तिसरा सामना ः १ नोव्हेंबर, दुपारी १.४० वाजता, मेलबर्न
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
पहिला सामना ः ३ नोव्हेंबर, सकाळी ९ वाजता, सिडनी, दुसरा सामना ः दुपारी १.४० वाजता, कॅनबेरा, तिसरा सामना ः ८ नोव्हेंबर ः दुपारी २ वाजता, पर्थ.