>> तिसवाडी ‘ब’ विभाग क्रिकेट
रुपेश सर्वणकरचे शानदार अर्धशतक आणि महेश भाईडकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बेतीच्या स्टॅमिना स्पोर्ट्स क्लबने यंग स्टार्स ऑफ मौळाचा ५१ धावांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित तिसवाडी ‘ब’ विभाग क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्टॅमिनाने ३८ षट्कांत ६ गडी गमावत २०७ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्या रुपेश सर्वणकरने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. मोहित रेडकरने ३९, प्रमोद नाईकने ३८ तर गौरेश कांबळीने ३४ धावांचे योगदान दिले. यंग स्टार्स ऑफ मौळातर्फे राजेश तुकादियाने ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळताना यंग स्टार्स ऑफ मौळाचा संपूर्ण संघ १५० धावांवर संपुष्टात आला. कार्तिककुमारने ५४, तर राजेेश मडिवालने ३५ धावा जोडल्या. स्टॅमिनाकडून महेश भाईडकरने ४ तर मोहित रेडकरने २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः स्टॅमिना स्पोर्ट्स क्लब, ३८ षट्कांत ६ बाद २०७, (मोहित रेडकर ३९, उदित यादव १७, रुपेश सर्वणकर ३९, प्रमोद नाईक ३८, गौरेश कांबळी ३४ धावा. राजेश तुकादिया ४-४५, संजय नाईक १-३८, गौतम नांद्रकर १-२० बळी) विजयी वि. यंग स्टार्स ऑफ मौळा, ३२.५ षट्कांत सर्वबाद १५६, (कार्तिककुमार ५४, शुभम कामत २८, राजेश मडिवाल ३५ धावा. महेश भाईडकर ४-४६, शदाब खान १-३७, मोहित रेडकर २-१७, उदित यादव २-१ बळी).