‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे जाणार्‍या आठ रेल्वेंचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

0
209

गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला जागतिक पर्यटनाशी जोडण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आठ आरामदायी रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ह्या रेल्वेसेवा दादर, वाराणसी, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर येथून सुरू करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे केवडियामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आतापर्यंत सुमारे ५० लाख पर्यटकांनी हा पुतळा पाहिला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी तिथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणामुळे जिथे रेल्वे पोहोचली नाही तिथे ती पोहोचणे शक्य होणार आहे. देशातील एकाच ठिकाणी एकाच वेळी विविध ठिकाणाहून आठ रेल्वे सुरू करणे हे ऐतिहासिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी मोदींच्या हस्ते केवडिया रेल्वे स्थानकाचे लोकार्पणही झाले.