उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथील एका रेल्वे मानवरहीत क्रॉसिंगवर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन चालत्या ट्रेनला धडकल्याने ७ ते ११ वयाचे १३ विद्यार्थी ठार झाले, तर ८ विद्यार्थी जखमी झाले.
मिळालेल्या वृत्तानुसार दुर्घटनेवेळी रेल्वे क्रॉसिंगजवळ गेटमन तैनात होता. त्याने व्हॅनच्या ड्रायव्हरला ट्रेन येत असल्याचे ओरडून सांगितले होते. मात्र ड्रायव्हरच्या कानात इयरफोन असल्याने गेटमनचा आवाज त्याला ऐकू आला नाही व लक्षात येण्याआधीच ट्रेन व्हॅनला धडकली व व्हॅनचा खुर्दा झाला. १३ विद्यार्थ्यांसह व्हॅनचालकही मृत्यूमुखी पडला. या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रु. ची मदत जाहीर केली. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही तेवढ्याच रकमेची मदत जाहीर केली आहे.