असोळणा-सासष्टी येथील ऍनी कायतानो सुकुरो डीसिल्वा या महिलेच्या जीए- ०८- क्यू ४०५२ या स्कूटरची डिकी फोडून अज्ञात चोरट्याने आतील ४० ग्रामाची सोनसाखळी व १ हजार रु. रोख मिळून सुमारे १ लाख रु.चा ऐवज लांबवला. सदर महिलेने पणजीतील सत्र न्यायालयासमोर स्कूटर पार्क करून ठेवली होती. त्यावेळी ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी पणजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.