राज्यातील पहिल्या सौरऊर्जेवरील फेरीबोटीचे उद्घाटन गुरुवार दि. १३ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता केंद्रीय आयुष आणि बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. देशात केवळ केरळ राज्यामध्ये सौरऊर्जेवरील फेरीबोट कार्यरत आहेत. राज्यातील पहिली सौरऊर्जेवरील फेरीबोट बांधण्यात आली असून, या फेरीबोटीच्या बांधकामावर सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्यात सौरऊर्जेवरील फेरीबोटीचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी येथील कॅप्टन ऑफ पोर्टच्या पथकाने केरळ येथे जाऊन सौरऊर्जेवरील फेरीबोटीची माहिती जाणून घेतली होती.