सोशल मीडियावर एखादी व्यक्ती, एखादा समूह, एखादा समाज अथवा धर्म यांच्याविषयी वाईट अथवा अपमानास्पद असे पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले आहे. आम्ही आधुनिक जगात राहत असून, सोशल मीडियाचा आपण जबाबदारपणे वापर करायला हवा. परस्परांविषयी आदर बाळगायला हवा आणि समाजात तेढ निर्माण होईल असे काहीही सोशल मीडियावर पोस्ट केले जाऊ नये, असे आवाहन एका पोस्टद्वारे जसपाल सिंग यांनी केले आहे.