सोमवारी देशात लसीकरणाच्या एका दिवसातील उच्चांकाची नोंद

0
35

सोमवारी दिवसभरात ८८ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून हा एक दिवसातील लसीकरणाचा विक्रम ठरला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १६ ऑगस्टपर्यंत देशभरात करोना लशीचे ५५ कोटी ४७ लाख ३० हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ८८.१३ लाख लसी देण्यात आल्या.

आतापर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे. आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन कोरोनबाधितांची नोंद झाली आहे. ही गेल्या १५४ दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची टक्केवारी केवळ १.१५ टक्के झाली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ४३७ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक कोरोनामुक्त झाले आहेत.