सोमनाथबुवांविरुद्धची अब्रुनुकसानीची याचिका न्यायालयाने फेटाळली

0
109

गोमंतकीय भजनाचार्य पंडित सोमनाथबुवा च्यारी यांच्यावर पर्वरी येथील भजन गायक मोहनदास पोळे यांनी पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणारी केलेली याचिका वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती ऍश्‍ली नोरोन्हा यांनी फेटाळली असून खटला लढवण्यासाठी आलेला २५०,४३९ रुपयांचा खर्च पोळे यांनी पं. सोमनाथबुवा च्यारी यांना द्यावा असा आदेश दिला आहे. २३ जुलै २००८ रोजी मोहनदास पोळे यांनी सदर खटला न्यायालयात दाखल केला होता. एकूण सहा वर्षे सात महिने चार दिवस हा खटला चालला. याचिकादार श्री. पोळे यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एस्. एम्. वळवईकर यांनी काम पाहिले तर पं. सोमनाथबुवा च्यारी व इतरांच्या वतीने (पानवेलकर कला सांस्कृतिक मंडळ) सुरवातीच्या काळात ऍड्. आयरिश रॉड्रिग्स व अंतिम सुनावणीच्यावेळी ऍड्. अमृत कांसार यांनी बाजू मांडताना मोहनदास पोळे यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे न्यायालयाला पटवून दिले. या याचिकेत दत्ताराम जी. नाईक, सोमनाथ च्यारी, संदीप नाईक (अध्यक्ष पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळ), सागर कुट्टीकर, शेखर कवळेकर, लवू कुट्टीकर, नीतेश नाईक, प्रदीप नाईक, तुळशीदास कवळेकर व एका वर्तमानपत्राच्या संपादकांना प्रतिवादी केले होते. या सर्व दहा प्रतिवाद्यांनी मिळून आपल्याला पाच कोटी रुपयांची अब्रुनुकसानी द्यावी असा दावा याचिकादार श्री. पोळे यांनी केला होता.