काल सायंकाळी फोंडा येथील मार्केटमधील व्यापार्यांची बैठक होऊन आज बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी ५ रुपये सोपो करावरून ६ रुपये चौ. मीटरला कर भरण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी पालिकेने काहींविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. पालिका व्यापारी संघ.चे अध्यक्ष किशोर मामलेकर, विष्णूदास मामलेकर, दिनेश मामलेकर, रामा परब, प्रवीण श्रीवंत, सुनीता सावंत आदी व्यापार्यांविरुध्द पोलिसांत तक्रारी नोंदवल्या आहेत व उद्या १० वाजता पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनवर बोलावले आहे. यापूर्वीही काहीजणांवर विविध कारणे देवून तक्रारी नोंदवल्या आहेत. बैठकीत ऍड्. जतीन नाईक, किशोर मामलेकर, नरेंद्र परब व इतरांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्याधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस अशा खोट्या तक्रारी नोंदवू शकत नाही, व्यापार्यांना सतावण्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याचे मत बैठकीत सांगण्यात आले.