सोपटे-शिरोडकरना वजनदार महामंडळे?

0
143

पणजी (न. प्र.)
कॉंग्रेस पक्षातून फुटून हल्लीच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपशी हातमिळवणी केलेले शिरोड्याचे सुभाष शिरोडकर व मांद्रेचे दयानंद सोपटे यांना वजनदार महामंडळे मिळणार असून सुभाष शिरोडकर यांची ईडीसीच्या अध्यक्षपदी तर दयानंद सोपटे यांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या ईडीसीच्या अध्यक्षपदी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर हे आहेत तर पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद वीजमंत्री निलेश काब्राल यांच्याकडे आहे. लवकरच अनुक्रमे त्यांच्या जागी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.भाजपने शिरोडकर व सोपटे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली नव्हती. मात्र, त्यांना वजनदार खाते देण्याचे आश्‍वासन दिले होते व ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.