सोनिया गांधींवर अमेरिकेत शस्त्रक्रिया

0
90

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर गुरुवारी अमेरिकेत एक गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांना पुढील तीन चार आठवडे तेथे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

सोनिया गांधी गेला काही काळ आजारी होत्या व त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे त्यांना अमेरिकेत उपचारांसाठी नेण्यात आले होते, अशी माहिती कॉंग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी काल दिली.

सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत चौघांच्या गटाकडे पक्षाचा तसेच राष्ट्रीय सल्लागार मंडळाशी संबंधित कामे हाताळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी, सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल व जनार्दन द्विवेदी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सोनिया यांच्या आजाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.