सोनसडोत बायोमेथेनेशन प्रकल्प उभारण्याचे न्यायालयाचे निर्देश

0
21

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव नगरपालिका प्रशासनाला सोनसडो कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी येत्या 15 दिवसांत बायोमेथेनेशन प्रकल्प उभारण्याचा निर्देश काल दिला.
गोवा खंडपीठात सोनसडो प्रकरणी याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. मडगाव येथे कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर जास्त प्रमाणात तोडगा काढण्यात आला आहे. मडगावातील कचऱ्यावर काकोडा येथील कचरा प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. या प्रकरणी सुनावणी येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.