रशियात चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत काल आणखी एक धक्कादायक निकाल लागला. जपान पाठोपाठ सेनेगलनेही जागतिक ८व्या स्थानारवील पोलंडला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जागतिक २७व्या स्थानावरील सेनेगलने पोलंवर २-१ अशी मात करीत विजयी सलामी दिली. विशेष म्हणजे आफिक्रन एखाद्या संघाचा हा या यंदाच्या विश्वचषकातील पहिला विजय ठरला. स्पर्धेतील आणखी एक स्वयंगोल घातक ठरला.
दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. परंतु सेनेगलचा संघ काहीप्रमाणात वचरढ ठरला होता. पोलंडच्या खेळाडूने नोंदविलेल्या स्वयंगोलामुळे सेनेगलने ३७व्या मिनिटाला आपले खाते खोलले. सेनेगलगच्या खेळाडूने डी कक्षेत घेतलेला जोरकस फटका क्लिअर करण्याच्या प्रयत्नात पोलंडच्या थिआगो सिओनेकने चेंडू स्वतःच्याच जाळीत टाकल्याने स्वयंगोल नोंदविला गेला (१-०). पहिल्या सत्रात सेनेगलने आपली आघाडी राखली.
दुसर्या सत्रात ग्रेझेर्गो क्रोकॉआकने ८६व्या मिनिटाला गोल नोंदवित पोलंडला १-१ अशी बरोबरी साधून देतानाचा सामन्यात चुरस आणली. परंतु पोलंडच्या बचावपटूकडून गोलीकडे बॅकपास देताना झालेल्या चुकीचा फायदा घेत सेनेगलचा स्ट्रायकर मब्बा नियांगने जोरदारपणे धाव घेत चेंडूवर नियंत्रण घेत खुल्या गोलपोस्टची दिशा दाखविली व संघाला २-१ असा विजय मिळवून दिला.