सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटने मदर ऑफ मर्सी इंग्लिश हायस्कूलवरील पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर १४ वर्षांखालील मुरगाव विभागीय प्रेझिडेंट्स कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. वास्कोच्या एमपीटी मैदानावर हा सामना खेळविण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफने पहिल्या डावात ९६ षटकांत २२३ धावा केल्या. त्यांच्या करण नाईक (४८) व सुजय परमाईकर (४८) यांनी उपयुक्त योगदान दिले. मर्सीकडून कुणाल बार याने ६५ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मर्सीचा संघ ४२.४ षटकांत १०८ धावांत आटोपला. मर्सीच्या केवळ शिवम हळदणकर (३५) याने प्रतिकार केला. जोसेफकडून द्विज पालयेकरने ३५ धावांत ४ व द्रिश नार्वेकरने २९ धावांत ३ गडी बाद केले. त्यामुळे जोसेफला पहिल्या डावाच्या आधारे ११५ धावांची आघाडी मिळाली. सेंट जोसेफने दुसर्या डावात २ गडी गमावून ४६ धावा केल्या. २३ पासून विद्यामंदीर हायस्कूल व सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट यांच्यात मुरगाव विभागीय अंतिम सामना खेळविला जाणार आहे.