>> भारत १५१वर गारद; लुंगीचे ६ बळी
कसोटी पदार्पणात सामनावीराचा किताब पटकावणार्या लुंगी एनगिडीच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात त्यांना १३५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाबरोबरच भारताने कसोटी मालिकाही गमावली. दक्षिण आफ्रिकेनी ३ कसोटींची मालिका २ -० अशी खिशात घातली. मालिकेतला अखेरचा सामना २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.
१९९२-९२ पासून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या ७ सामन्यांपैकी केवळ सहा कसोटी गमावलेल्या आहेत आहे. २०१०-११ साली भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखली होती.
२८७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी टीम इंडियाची आपले पहिले तीन शिलेदार ३५ धावांवर गमावले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर पराभवाचे सावट उभे राहिले होते. काल पुढे खेळताना भारताचा दुसरा डाव १५१ धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या लुंगी एनगिडीने पदापर्णातच भारतीय फलंदाजीला सुरंग लावताना ६ बळींचे घबाड मिळविले. कसोटी पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळविणारा लुंगी दक्षिण आफ्रिकेचा ६वा खेळाडू ठरला. भारतातर्फे रोहित शर्माने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. मोहम्मद शामीने २८ तर चेतेश्वर पुजारा व पार्थिव पटेल यांनी प्रत्येकी १९ धावा जोडल्या. इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आफ्रिकेतर्फे लुंगीच्या ६ बळींव्यतिरिक्त कागिसो रबाडाने ३ बळी मिळवित संघाच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली आहे.
धावफलक,
दक्षिण आफ्रिका, पहिला डाव ः ३३५., भारत, पहिला डाव ः ३०७. , दक्षिण आफ्रिका, दुसरा डाव ः २५८. , भारत, दुसरा डाव ः (चौथ्या दिवसाच्या ३ बाद ३५ वरून पुढे) चेतेश्चर पुजारा धावचित १९, पार्थिव पटेल झे. मोर्ने मॉर्केल गो. कागिसो रबाडा १९, रोहित शर्मा झे. अब्राहम डीविलियर्स गो. कागिसो रबाडा ४७, हार्दिक पंड्या झेल क्वींटन डी कॉक गो. लुंगी एनगिडी ६, रविचंद्रन अश्विन झेल क्वींटन डी कॉक गो. लुंगी एनगिडी ३, मोहम्मद शामी झे. मोर्ने मॉर्केल गो. लुंगी एनगिडी २८, ईशांत शर्मा नाबाद ४, जसप्रीत बुमराह झे. वर्नोन फिलँडर गो. लुंगी एनगिडी २.
अवांतर ः ५. एकूण ५०.२ षट्कांत सर्वबाद १५१. गोलंदाजी ः वेर्नोन फिलँडर १०/३/२५/०, कागिसो रबाडा १४/३/४७/३, लुंगी एनगिडी १२.२/३/३९/६, मोर्ने मॉर्केल ८/३/१०/०, केशव महाराज