सूचनाला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
19

स्वतःच्याच 4 वर्षीय मुलाच्या खुनाचा आरोप असलेल्या बंगळूर येथील एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिची पणजी येथील बाल न्यायालयाने 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी काल केली. बुधवार दि. 31 जानेवारीपर्यंत तिची न्यायालयीन कोठडी कायम असेल.

कळंगुट पोलिसांनी संशयित सूचना सेठ हिचा पाच दिवसांचा रिमांड संपल्यानंतर पाटो पणजी येथील बाल न्यायालयासमोर काल हजर केले. यावेळी बाल न्यायालयाने 13 दिवसांसाठी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
8 जानेवारीला स्वत:च्याच मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेली संशयित सूचना सेठ ही मागील 11 दिवस पोलीस कोठडीत होती. पोलीस कोठडीतील चौकशीत सूचनाने मुलाच्या खुनाची कबुली दिलेली नाही.