बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी 2.20 वाजता दिल्लीहून पाटणा विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पोलिस व्हॅनमधून पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आरएसएस कार्यालय, विधान परिषद व नंतर भाजप कार्यालयात आणण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव दिघा घाटावर आणण्यात आले, तेथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्करोगामुळे सोमवारी त्यांचे दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले होते.