सुशांतसिंहप्रकरणी ‘त्या’ व्यावसायिकाची चौकशी

0
107

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी ईडीने गोमंतकीय व्यावसायिकाची काल चौकशी केली. सुशांतला त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीमार्फत सदर व्यावसायिक अमली पदार्थ पुरवायचा असा दावा केला जात होता. याच प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सदर व्यावसायिकाची चौकशी केली. या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एम्सच्या फॉरेन्सिक टीमचा अहवाल आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा आणि ऑटोप्सी रिपोर्टही आहे. दरम्यान, मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांचीही चौकशी करण्यात आली.